नांदेड:( दि.३० ऑगस्ट २०२४)
महाराष्ट्र सांस्कृतीक संचलनालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व सप्तरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पोवाडा गीत गायन व कथ्थक नृत्य स्पर्धेमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या संगीत विभागाला तृतीय व द्वितीय पारितोषक प्राप्त झाले आहे.
पोवाडा गीत गायन स्पर्धेमध्ये माधवी मठपती,दुर्गा जगदंबे, अंकिता भारती, विश्वनाथ माटाळकर, प्रज्योत कांबळे, प्रदीप नरवाडे, उदय जाधव,
मंगेश भालेराव यांनी व कथ्थक नृत्यामध्ये कु.रुद्रानी मोरे यांनी सहभाग घेऊन पारितोषिक प्राप्त केले.
यशस्वीत्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संगीता चाटी आणि संगीत विभागप्रमुख डॉ.शिवदास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सुयशाबद्दल माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक श्री.एस. व्ही. पाटील, डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डी.एस. ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा