*पोदार प्रेप सह स्वातंत्र्याचे रंग प्रेमाचे बंध!*

आज आपल्या भारत भुमीचा ७८ वा स्वातंत्र्य दिन पोदार प्रेप नांदेड येथे चिमुकल्या मुलांसमवेत साजरा करण्यात आला. प्रेप च्या संचालिका डॉ. स्वाती वत्स यांच्या संकल्पनेतून शाळेत स्वातंत्र्य दिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

' स्वातंत्र्याचे रंग प्रेमाचे बंध ' या मध्यवर्ती  संकल्पनेवर आधारित शाळेत लहान मुलांना त्यांच्या आजी-आजोबांसह आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात राष्ट्रीय प्रतीके, मेमरी गेम, ड्रॉइंग, मॅजिक बुकमार्क, ओरिगामी लोटस तसेच, संगीत वाद्य, गोंड आर्ट व इंडिया मॅप पझल अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांना चिमुकल्या मुलांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

यावेळी मुले विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. शेवटी रॅम्प वॉक साठी पालकांनी आपल्या मुलांसह सहभाग घेतला. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ मालिनी सेन, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका मा. पद्मिनी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रशासकीय अधिकारी  यांच्या उत्तम आयोजनामुळे कार्यक्रम उत्तम पार पडला. प्रेपच्या शिक्षिकांनी उपक्रमांची उत्तम मांडणी केली व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी ठरला.

टिप्पण्या