*यशवंत ' मध्ये संगणकशास्त्र सत्रारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न*

 


नादेड: (दि.२२ ऑगस्ट २०२४)

          श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ  मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यामान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार  संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाने नुकतेच  सत्रारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

           याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्या डॉ.कविता सोनकांबळे,  प्रमूख अतिथी एम.जी.एम. कॉलेजचे डॉ.सुनील डहाळे, विभागप्रमुख  डॉ.एस.जी.जाधव, डॉ.पी.बी.पाठक, प्रा. एन.ए.नाईक होते. 

          प्रारंभी प्रास्ताविकात विभागातील विविध संगणक अभ्यासक्रमांची, उपक्रमांची व शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती विभागप्रमुख डॉ.एस.जी.जाधव यांनी  दिली.

          प्रमुख अतिथी डॉ.डहाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आजच्या युवापिढीने नवनवीन तंत्रज्ञानाचे व संगणकीय भाषचे ज्यात पायथॉन, जावा प्रोग्रामवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, कारण कॉर्पोरेट कंपनीत नोकरीसाठी  या सर्व गोष्टीची आवश्यकता असते तसेच विविध शैक्षणिक उपक्रमात सुद्धा विद्यार्थ्यांनी नेहमी अग्रेसर राहिले पाहिजे, असे मत व्यक्त करून नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

           माजी विभागप्रमुख डॉ.पी.बी. पाठक यांनी, संगणक क्षेत्रातील नवनवीन नोकरीच्या संधीची माहिती दिली.

           अध्यक्षीय  समारोपात डॉ.कविता सोनकांबळे यांनी, आज सर्व जग हे  आर्टिफिशियल इंटिलीजन्सकडे  हळूहळू जात आहे व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या चमत्काराने भारताची अभूतपूर्व प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत आहे, असे मत व्यक्त केले.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गुरुप्रसाद चौसटे यांनी केले तर आभार  प्रा.सीमा शिंदे यांनी मानले.

          याप्रसंगी डॉ.प्रवीण तामसेकर, प्रा.आमरीन खान, प्रा.सचिन वडजे, प्रा. चैतन्य देशमुख, प्रा.नीलम अग्रवाल, प्रा.शैलेश माने यांची उपस्थिती होती.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल. व्हि.पद्ममाराणी राव, डॉ. एम.एम. व्ही. बेग, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे, माणिक कल्याणकर, अनुराधा मती यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या