आत्मबलिदानातू मिळाले लेल्या स्वातंत्र्यलढ्याचे मोल आजच्या पिढीला जपावे‌ लागेल!*


*९ ऑगस्ट क्रांती‌दिनी आदित्य ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन!*

मुंबई दि.९ : आत्मब लिदानातून‌ मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे मोल जपण्याचे काम नव्या पिढीला करावे लागेल,असा विश्वास शिवसेना युवानेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केला आहे.शिवसेनेचे उपनेते,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनीही हुतात्म्यांना अभिवादन केले.

   राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त नाना चौक येथून कामगारांची मूक मिरवणूक गवालिया टॅंक मैदानापर्यंत काढण्यात आली.युवासेनानेते आदित्य ठाकरे,रामिम  संघाचेअध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मूक मिरवणूक गवालिया टॅंक मैदाना पर्यंत नेण्यात आली.तेथे मान्यवर नेत्यांच्या वतिने हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिल्या नंतर, विनम्र अभिवादन करण्यात आले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गेली ७५ वर्षे हा अभिवादनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड,सुनिल अहिर, मिलिंद तांबडे,किशोर रहाटे,साई निकम आदी पदाधिकाऱ्यांनी  हुतात्म्यांना अभिवादन केले.•••

टिप्पण्या