शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालय सेलू चे वर्चस्व. खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक: अनंता साळवे (कक्ष अधिकारी मुंबई)




सेलू:-   खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक आहे, यातून जीवन सफल होईल असे प्रतिपादन शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन प्रसंगी अनंता साळवे कक्ष अधिकारी मंञालय मुंबई यांनी केले. 

   मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा दि. २४ ऑगस्ट रोजी नूतन विद्यालय सेलू उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष:- मा. संतोष पाटील (मुख्याध्यापक)

उद्घाटक म्हणून अनंता साळवे (कक्ष अधिकारी मंञालय, मुंबई),प्रमुख उपस्थिती: किरण देशपांड (उपमुख्याध्यापक), डी.डी.सोन्नेकर (पर्यवेक्षक), सुयश नाटकर (क्रीडा अधिकारी परभणी) माजी क्रीडा शिक्षक सतिश नावाडे, गणेश माळवे (जिल्हा सचिव टे.टे.असो परभणी)आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे,तर सुञसंचलन प्रा. नागेश कान्हेकर, आभार प्रदर्शन राजेश राठोड यांनी मानले.

            स्पर्धा १४/१७/१९ वयोगटातील मुले मुली गटात आयोजित करण्यात आल्या. गंगाखेड, पुर्णा, परभणी, सेलू तालुक्यातील २८ संघाचा समावेश होता.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.‌१४ वर्षे मुले गटात प्रथम : नूतन विद्यालय सेलू,द्विलीय - बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू,

तृतीय : बोर्डीकर पोदार इग्लिश स्कूल सेलू

 14 वर्षे मुली:-प्रथम : नूतन विद्यालय सेलू -द्वितीय : प्रिन्स इग्लिंश स्कुल सेलू -

 17 वर्षे मुले:-प्रथम नूतन विद्यालय सेलू,द्वित्तीय : बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू, तृतीय: प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू

 17 वर्षे मुली.:-प्रथम नूतन कन्या प्रशाला सेलू - द्वितीय संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड.

19 वर्षे मुले प्रथम : संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड

द्वितीय : नूतन महाविद्यालय सेलू

 19 वर्षे मुली -प्रथम : संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड

द्वितीय: तृतीय :- नूतन महाविद्यालय सेलू.

स्पर्धा पंच प्रमुख चेतन मुक्तावार, तर पंच तुषार जाधव, सूरज भुजबळ, स्वप्निल आरसूळ, अनुराग आंमटी, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, संजय भुमकर, स्वप्निल चव्हाण, आनंद क्षिरसागर, सिध्देश्वर , सुरज शिंदे,गंगाधर आव्हाड,आदीने सहकार्य केले.

टिप्पण्या