योगासन भारत या राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय योगासन झोन वुमन्स लीग या स्पर्धेत संपूर्ण भारतातून चार झोन केले आहेत. वेस्ट झोन च्या अंतर्गत राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, दिव दमन, दादर नगर हवेली या आठ राज्यांचा समावेश आहे.
योगासन भारत या नॅशनल योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने दिनांक 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत जोधपुर राजस्थान येथे स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे नूतन योगा सेंटर सेलू येथील शिल्पा पिंपळे आणि अनुजा सुभेदार या दोघी ट्रॅडिशनल योगासन या प्रकारात सहभाग नोंदवणार आहेत. शिल्पा पिंपळे शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेत कास्यपदक प्राप्त आहेत. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय द्वारे जनजातीय खेल महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय योगासन स्पर्धा ओरिसा येथे सहभाग, इंटर युनिव्हर्सिटी योगासन क्रीडा स्पर्धा सहभाग , योगशिक्षिका, राज्यस्तरीय योगासन पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन चार वर्षांपासून पंच आणि योगासन मार्गदर्शिका म्हणून कार्यरत आहेत. आणि अनुजा सुभेदार ह्या नूतन विद्यालय सेलू येथील सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने नुकतेच याबाबत निवड झाल्याचे कळवण्यात आले आहे. नूतन योगा सेंटर सेलूचे योग मार्गदर्शक देविदास सोन्नेकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस एम लोया उपाध्यक्ष डी के देशपांडे चिटणीस डॉ. व्ही के कोठेकर सहचिटणीस जयप्रकाश बिहानी, परभणी डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी उपाध्यक्ष निखिल वंजारे, डॉ. चारुशीला जवादे, कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी, चिटणीस देविदास सोन्नेकर, सहचिटणीस कृष्णा कवडी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, गणेश माळवे, नागेश कान्हेकर, प्रशांत नाईक, प्रा. कमलाकर कदम यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा