परभणी (. )दि. ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तर टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या ०९ वर्षीय *आद्या बाहेती* हिने अजिंक्य पद पटकावले.
या स्पर्धेत तिने ११, १३ वर्षाखालील मुलींच्या गटात सहभाग नोंदवला होता.
तिचे सर्व सामने चुर्शीच झाले.
यातील महत्वाचे सामने म्हणजे उपांत्य-पूर्व फेरीच्या सामन्यात तिने ठाणे जिल्ह्याच्या तृषा मोरे हीचवर ३-१ आसा तर उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाणे जिल्ह्याचा जिनाया वधान या खेळाडूवर ३-२ आसा विजय मिळवला अंतिम सामन्यात तिला नाशिक जिल्ह्याच्या केशिका पुरकर चे कडवे आव्हान होते ते ३-१ आसे मोडीत काढत विजेतेपद मिळवळे त्यामुळे ती राज्य स्पर्धेत अजिंक्य ठरली.
ही स्कॉटिश अकॅडमी या शाळेची खेळाडू विद्यार्थिनी आहे. तर ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, क्रीडा व युवक सेवा संचलनालय म.रा.पुणे व भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांच्यामार्फत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
तसेच तिला विजय अवचार, अजिंक्य घन, तुषार जाधव,सुरज भुजबळ, रोहित जोशी, श्रीकांत दुधारे, उमेश देशमुख,गौस खान पठाण, चेतन सुरवसे, विक्रम हत्तेकर, निखील झुटे , पठाण गौस यांनी सरावासाठी मेहनत घेतली.
या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावांदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, नानक सिंग बस्सी, सुयश नाटकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैय्या वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ , जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत, परभणी क्लब चे सचिव विवेक नावंदर, जिल्हा सचिव गणेश माळवे, डी.पी.पंडीत, वरिष्ठ खेळाडू,पालक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा