नांदेड:(दि.३ ऑगस्ट २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.२ ऑगस्ट रोजी श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांची जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूण ७५ रक्तदात्यांनी यावेळेस रक्तदान केले.
यामध्ये प्रामुख्याने कॉलेज स्टाफमधून उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे, डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ.संदीप खानसोळे,कार्यालयीन प्रबंधक श्री. संदीप पाटील, डॉ.साईनाथ शाहू, प्रा.माधव दुधाटे, प्रा.अर्जुन गुरखुदे, प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा. हुलसुरे, श्री. सचिन धरणे, श्री.विठ्ठल सुरनर, श्री.नितीन काकडे, श्री.प्रसाद सावंत, श्री.पंडित बेळीकर, श्री.परशुराम जाधव तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड, प्रा.हुलसुरे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, आनंदा शिंदे, पोशेट्टी अवधूतवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा