लोकमान्य टिळक-अण्णाभाऊ साठे,आजच्या पिढीचा आदर्श!* राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अभिवादन!

     मुंबई दि.१: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने अभिवादन सोहळा पार पडला.या प्रसंगी थोर विभूतींचा आदर्श आजच्या पिढीने पुढे न्यावा, असे आवाहन करण्यात आले. 

     संघटनेचे अंध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंद राव मोहिते यांनी थोर विभूतींना अभिवादन केले आहे.

    परेलच्या मजदूर संघांमधील वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात प्रारंभी सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला तर संघटनेचे जनसंपर्क अधिकारी आणि कथालेखक काशिनाथ माटल यांनी थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,थोर विभूतींना अभिवादन केले आहे. 

    या प्रसंगी उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सांगितले,लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करतांना देशाभिमान जागवला. तर थोर समाजसुधारक,साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कसदार साहित्यातून इतिहास घडवला.     

     कथा लेखक काशिनाथ माटल यांनी आपल्या भाषणात थोर‌ नेत्यां च्या स्फूर्तींना उजाळा दिला.

     ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले.सर्वश्री जी‌.डी.आंबेकर कॉलेजचे विलास डांगे,कार्यालयीन अधीक्षक मधू घाडी,जी.डी.आंबेकर कॉलेजच्या शिक्षिका वैशाली हेगडमल आणि विद्यार्थी,मोहन पोळ,सूरेश मोरे, दिपक वाळवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.••••

टिप्पण्या