*छत्रपती संभाजी नगरमधील "लक्ष्मी अग्नी कंपनी"च्या कामगारांना अध्यक्ष सचिन अहिर यांनी मिळवून दिली भरघोस पगारवाढ!*

   दि.१३: छत्रपती संभाजी नगर,वाळुंज येथील एम.आय.डी.सी. मधील टू व्हीलर,थ्री व्हीलर गाडीच्या स्पेअर पार्टचे उत्पादन आणि ऍसम्बल करणा-या लक्ष्मी अग्नी कोपोनंट ऍन्ड बोर्डिंग प्रायव्हेट लिमिटेड‌ या कंपनीतील कामगारांना‌ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी महिना ८,3०० रुपये भरघोस पगारवाढ मीळवून देणारा करार केला आहे. 

     महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि कंपनीच्या व्यवस्थापना‌ बरोबर कामगारांच्या पगार वाढीवर नुकताच संभाजी नगर येथील कंपनीत करार पार पडला.संघटनेच्या वतीने‌‌ अध्यक्ष‌ आमदार सचिन भाऊ अहिर,उपाध्यक्ष राजन लाड यांनी तर कंपनी व्यवस्थापना‌च्या वतीने मॅनेजर-एच आर निलेश चुडीवाल, सहाय्यक मॅनेजर-एच आर रवी घुगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.त्यावेळी सादीक खान,अशोक निकम रुणाल‌ लाड,जयराज डेरे,आदी कमिटी सदस्य उपस्थित होते.

    या करारानुसार कामगारांना कॅन्टीनची सुविधा,मेडिक्लेम पॉलिसी,बसभाडे भत्ता आदी सुविधा मिळणार असून,या कराराने या वर्षाचा बोनसही मिळवून दिला आहे.या कराराद्वारे अध्यक्षांनी युनियनच्या नेतृत्वाखाली‌ कामगारांच्या श्रमाला योग्यतो न्याय मिळवून दिला आहे,असे कामगारांनी समाधान व्यक्त करताना म्हटले आहे.करार‌ १ मार्च २०२३ ते २०२७ पर्यंत, तीन वर्षांसाठी असून, थकबाकीपोटी प्रत्येकी ४० ते ४५ हजार रुपये कामगारांना मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या कराराचे स्वागत केले आहे.

••••

टिप्पण्या