*गंगाखेड (प्रतिनिधी)* पतंजली योग समिती गंगाखेड च्या वतीने शहरातील गोदावरी मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत सकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना पतंजली योगपीठ चे प्रशिक्षक प्रमाणपत्र मिळेल, योग ट्रेनर म्हणून प्रशिक्षण वर्गासाठी पात्रता तयार होते, परदेशात योग प्रशिक्षक म्हणून जाण्याची संधी मिळते, योग स्पोर्ट सर्टिफिकेटची तयारी करता येते. या प्रशिक्षण शिबिरासाठी योग प्रशिक्षक निखिल वंजारे, गोपाळ मंत्री, प्रकाश डिकळे, अंकुश मदनवाड, बालासाहेब गजमल हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराचे अनेक फायदे आहेत अशा या योगी शिबिरात जास्तीत जास्त योग प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन पतंजली योग समिती गंगाखेड तर्फे करण्यात आले आहे.
*गंगाखेड मध्ये सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
addComments
टिप्पणी पोस्ट करा