नांदेड ( प्रतिनिधी) : परक्या चे धन आणि परस्री माणसाला सुखी करू शकत नाही, तर बरबाद करते. रावणाने सीता मातेचा हात धरला तर लंका जळाली.कलकत्त्याच्या दुष्टाची पण जळेलच. तथापि मुलींच्या रक्षणाची जवाबदारी पालकांची असून मुलींना खूप शिकवा, मोठे करा,सोबतच मॉ. जिजाऊ, अहिल्यादेवी, झाशीच्या राणी प्रमाणे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण द्या असे आवाहन आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक कथाकार प. पू. पंडित प्रदीप जी मिश्रा ( सिहोर वाले) यांनी शुक्रवारी ( ता. 23) केले.
कवठा परिसरातील मोदी क्रीडांगणावर
शुक्रवारी ( ता. 23) शिव महापुराण कथेस उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला कथा श्रवणासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा जनसागर पहिल्याच दिवशी उसळला.
विराट जनसमुदायासमोर आपल्या रसाळ वाणीतून "बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण "कथेचे विमोचन करतांना पंडित प्रदीप जी मिश्रा ( सिहोरवाले) यांनी प्रारंभीच गोदातीरी वसलेल्या नांदेड ( नंदीग्राम) नगरीत भगवान शंकराने गोदावरीस जिथे उपदेश दिला होता. असे महात्म्य स्पष्ट केले.
सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवद्गीता, रामायण, पुराण, शास्त्रे केवळ कपड्यात बांधून चालणार नाही तर मुलांना शिकवावे लागतील. दररोज मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर एक लोटा जल अर्पण करा, मन, हृदय आणि चित्त वृत्तीने पाच मिनिटे भगवान शिवाशी एकरूप व्हा, असे सांगून ढोंग, देखावा खड्ड्यात नेणारा, धोका देणारा असून ढोंगापेक्षा ढंगाने जगा, भोलेनाथ तुमचा हात पकडून पुढे नेतील. असा हितोपदेश पंडित प्रदीप जी मिश्रा यांनी दिला.
जाती , वर्ण हे मानवानेच वाटून घेतले असून आपले शुभचिंतक कमी असले तरी चालतील मात्र जळणारे आणि इर्षा करणारे कमी व्हायला नकोत तेव्हा प्रगती होईल. असे नमूद करत कुठल्याही परिस्थितीत संसाराला स्वर्ग बनवते तीच खरी श्रेष्ठ स्त्री असल्याचे पंडित प्रदिप जी मिश्रा यांनी सांगितले.
कथेचे पहिले पुष्प विश्राम होतात वरून राजाने हजेरी लावली. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
____________________________
चौकट
चव्हाण, चिखलीकर ,पोकर्णा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती !
शिव महापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.ओमप्रकाश पोकर्णा, बजरंग सिंग जी, यजमान नांदेडकर,पातेवार, यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. अशोकराव चव्हाण , प्रतापराव पाटील चिखलीकर, यांनी प्रारंभी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
प्रशासनाचे चोख नियोजन..!
कथास्थळी वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता भगतसिंग चौक ते लुटे चौक पर्यंत तिन्ही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आला. यासोबतच कथास्थळी आरोग्य विभागाच्या वतीने चाळीस डॉक्टर्स, परिचारिका,दीडशे कर्मचारी सेवेत भाविकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आले आहेत.
____________________________
addComments
टिप्पणी पोस्ट करा