नांदेड:( दि.२० ऑगस्ट २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला सुरक्षा व सुधार समितीच्या वतीने 'सायबर क्राईम' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक सौ. अनिता नामदेव चव्हाण उपस्थित होत्या. त्यांनी मार्गदर्शन करताना, मुलींनी इंटरनेट, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हाट्सअप; एकंदरीत मोबाईल वापरते वेळेस कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुलींनी विविध प्रकारचे ॲप्स घेते वेळेस त्याचे पूर्ण व्हेरिफिकेशन करूनच घेतले पाहिजेत. लहान मुलांना गेम्सपासून लांब ठेवले पाहिजे. रोजगार निर्मितीची व लग्नासंबंधीची जी ॲप्स असतात आणि त्याला मुली बळी पडतात; त्यापासून मुलींनी दूर राहिले पाहिजे. आपला ओटीपी नंबर कोणालाही शेअर करू नये. आपले पर्सनल फोटो कुणालाही शेअर करू नये. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यासाठी जी विविध कलमे आहेत; त्याची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगल कदम यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजश्री भोपाळे यांनी केले तर आभार डॉ.अंजली गोरे यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ.एल.व्ही. पद्माराणी राव, डॉ.संगीता शिंदे(ढेंगळे), डॉ.अर्चना गिरडे, डॉ.कविता केंद्रे, डॉ. नितारानी जैस्वाल, डॉ.मीरा फड, डॉ. एस.एम.दुर्राणी, प्रा.संगीता चाटी व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा