मुंबई दि.१९:राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने आद्य संस्थापक स्व.गं.द.आंबेकर यांच्या ११७ व्या जयंतीच्या औचित्याने २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता,परेलच्या महात्मा गांधी सभागृहात,आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ कॉंग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.सरचिटणीस गोविंदराव मोहिते उपस्थितांचे स्वागत करतील.
संघटनेने नुकतिच आपल्या यशस्वी वाटचालीची ७५ वर्षे पूर्ण केली.त्या प्रित्यर्थ केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी.संजीवा रेड्डी यांना श्रमरत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाच्या आंबेकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी कॉंग्रेस नेते आमदार भाई जगताप ठरले आहेत.त्यांना आंबेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
या प्रसंगी महाविकास आघाडीचे खासदार ठाकरे गटाचे अरविंद सावंत,अनिल देसाई, संजय दीना पाटील आणि मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचाही अतितटीच्या निवडणुकीत विजय संपादन केल्या बद्दल सन्मान करण्यात येईल.
औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १)हरिभाऊ तांबे (सिन्नर)रिंग प्लस ऍक्वा लिमिटेड कंपनी,कामगार चळवळ २)दिलीप खोंड(मुंबई)व्ही.व्ही.एफ.इंडिया-सामाजिक,३)विलास पंचभाई( नाशिक) साहित्य-महिंद्रा ऍन्ड महिंद्रा,४) संतोष शिंदे (रत्नागिरी)कला-हिंदुस्थान युनिलिव्हर,५)कु.नेहा साप्ते (मुंबई)
क्रीडा-मंत्रालय लिपिक,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू! या सर्वांना श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कामगारचळीत प्रतिष्ठेचा ठरलेला जीवन गौरव आणि श्रम गौरव पूरस्काराचे स्वरूप असे आहे, शाल-श्रीफळ,मानपत्र,स्मृती चिन्ह आणि धनादेश! श्रमरत्न ७५ रू.,जीवन गौरव पुरस्कार ५१हजार रू.आणि श्रम गौरव पुरस्कार प्राप्त मान्यवरांना प्रत्येकी ३५ हजार रुपयांचा धनादेश पारितोषिकाच्या रुपात प्रदान करण्यात येतील.
आजवर जीवन गौरव पुरस्काराचे १० मान्यवर कामगार संघटनांचे लोकप्रिय कामगार नेते मानकरी ठरले आहेत.
तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगार चळवळ, सामाजिक,साहित्य,कला आणि क्रीडा या विभागातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवळपास ५५ कामगार श्रम गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.वर्षोनुवर्षे हे पुरस्कार मानाचे आणि प्रतिष्ठेचे ठरू लागले आहेत. यंदाचा ११ वा जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार सोहळा आहे.!••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा