नांदेड:( दि. २ऑगस्ट २०२४)
विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा तयार होण्याची आज निकड आहे. सार्वत्रिक मानवी मूल्य वृद्धीकरिता आज विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी आपापसात सामाजिक एकात्मता वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित इंडक्शन प्रोग्राममध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय ननवरे, डॉ.एच.एल.तमलूरकर, डॉ. धनराज भुरे, डॉ.बतुला बालाजीराव, डॉ.मंगल कदम यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय ननवरे यांनी, आधुनिक काळात दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. कार्पोरेट जग गतिमान असून बऱ्याच दररोज बऱ्याच नवीन गोष्टी घडत आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी नवीनतम ज्ञानाने स्वतःला अपडेट ठेवून कोणत्याही स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन केले तसेच त्यांनी महाविद्यालयातील व प्राणीशास्त्र विभागातील सोयीसुविधा, प्राणीशास्त्राच्या विविध शाखा, संगणकीय सुविधा व त्याचे महत्त्व आणि करियर संधीची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नारायण गव्हाणे यांनी केले आणि आभार डॉ.साहेब माने यांनी मानले.
याप्रसंगी डॉ.नीताराणी जयस्वाल आणि डॉ.दीप्ती तोटावार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल. व्ही. पदमारानी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, परमेश्वर राठोड, शिवशंकर मिरेवाड, एजाज शेख, श्री.तांदळे, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरनर, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा