महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक 20 आगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा हिंगोली विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सामील होण्याचे आव्हान अनिल पतंगे यांनी केले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, या जुलमी सरकारच्या धोरणावर शेतकरी चालला सरणावर कोरडवाहू भाग असल्याने शेतकरी पिढ्यानपिढ्या कर्जबाजारी जिवन जगत आहे. दिवसेंदिवस रसायनिक खत बि -बियाणे आणि औषधांच्या वाढत्या किंमती व वाढवणारा खर्च आवाक्याबाहेर गेला असुन आपल्याकडे मुख्य पिक असलेल्या सोयाबीन, तुरी, हरभरा, कापुस, या पिकांना योग्य हमीभाव व बाजार भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.बेंकांचा मनमानी कारभार आणि खाजगी सावकार या दोन्ही चक्रात शेतकरी अडकून पडला आहे. सरकार निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून फसव्या आणि तात्पुरत्या योजना दाखवत जनतेची दिशाभूल करत आहे. या लबाड सरकारच्या विरोधात मोठ्या संख्येने एकत्र येऊन आवाज ऊठवणे गरजेचे आहे. म्हणुन शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा, पिकविमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा, सोयाबीन, कापुस, तुरी, हरभरा या पिकांना यौग्य हमीभाव वाढवून सोयाबीन ला 7 हजार तर कापसाला 15 हजार हमी भाव द्या, शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करा, पिक कर्ज वाटप पुनर्गठन करून नविन पिक कर्ज देण्यात यावे, विजेपासून त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, विज जोडणी,डिपी बसविने, नविन सोलारपंप दुरूस्ती करून द्यावे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन विहीर, गोठ्यासाठी होत असलेली पिळवणूक थांबवा, सरकारी नौकरभरती परिक्षा मधील घोटाळा थांबवा, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मानधनात वाढ करा आदि विविध मागण्यासाठी मंगळवारी शेतकरी आक्रोश मोर्चा व आंदोलन करण्यात येणार असुन या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे, बाजार समिती संचालक बंडू मुटकूळे, मनिष आखरे , माधव कोरडे, रवि गडदे यांच्या सह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा