पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या चार वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर लोकार्पण सोहळा गावचे लोकनियुक्त सरपंच जे. डी. टेमगिरे, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे, बीट विस्तार अधिकारी उषा मसळे, शिवशंकर दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टेमगिरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब टेमगिरे, माजी सरपंच सिताराम गुंड, महिला फेडरेशनच्या अध्यक्षा निलमताई टेमगिरे, शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष नितीन टेमगिरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या उपस्थित पार पडला. असे मारूति विश्वासराव कळवित आहेत.
*थोरांदळे गावातील आदर्श शाळेच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न*
addComments
टिप्पणी पोस्ट करा