मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत* *4.73 लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3 हजार*

• *15 ऑगस्ट पासून डिबिटीद्वारे वितरण* 

• *सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार* 

• *ज्यांच्या खात्यात जमा झाले नसेल त्यांनाही मिळेल लाभ* 

नांदेड दि. 16 ऑगस्ट :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिला भगिनिंच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा होणे 15 ऑगस्टच्या दुपारपासून सुरू झाले आहे. आधारलिंक असणाऱ्या सर्व पात्र खात्यामध्ये आज, उद्या पर्यंत सर्वांना हा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र महिलांची संख्या 4 लाख 73 हजार आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये जिल्ह्यात 6 लाखावर अर्ज दाखल झाले आहेत. अजूनही अर्ज दाखल करणे सुरू आहेत. आता पोर्टल कार्यान्वित झाल्यामुळे ज्यांनी अर्ज दाखल केले नसेल त्यांनी देखील तातडीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यभरातील महिलांशी संवाद साधून त्यांना ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. सोबतच रक्षाबंधनाच्यापूर्वी सर्वांच्या खात्यामध्ये डिबिटीद्वारे पैसे जमा होतील, असेही स्पष्ट केले आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय समितीने ज्या 4 लाख 73 हजार पात्र महिलांच्या अर्जाला मान्यता दिली आहे त्या सर्वांना हा लाभ पुढील काही दिवसात मिळणार आहे. 

*आनंदी महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया*

आज या संदर्भात अनेक महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या मोबाईलवर मॅसेज दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुढेही सुरू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतांना रक्षाबंधनाच्यापूर्वी मिळालेल्या ओवाळणीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. 

00000

टिप्पण्या