34 व्या सिनियर राज्यस्तरीय सेपक टाकरा स्पर्धेसाठी नांदेड जिल्हाचा संघ जाहीर*

दिनांक : 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत ठाणे येथे महाराष्ट्र सेपक टाकरा असोसिएशन व सेपक टाकरा असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 34 वी सिनियर राज्यस्तरीय सेपक टाकरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघ निवड चाचणी चे आयोजन दिनांक 21 जुलै 2024 या कालावधीत लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल, अनिकेत नगर नांदेड येथे करण्यात आले होते या निवड चाचणीतून खालील खेळाडूंची 34 वी सिनियर राज्यस्तरीय सेपक टाकरा स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे: आनंद संतोष पंडित (कर्णधार) असंग सुधीर जोंधळे,सुदेश उत्तम कांबळे,क्षितिज तुकाराम सूर्यवंशी,निशांत अशोकराव कदम,रोहित जयराम सूर्यवंशी,आर्यन स्वपणेश केशेट्टीवार,शाश्वत राहुल गोधने, पृथ्वीराज महेंद्रसिंग ठाकूर, सचिन उत्तम कांबळे ,रोहन आत्माराम फड तर मुलींमध्ये आरती महेंद्रसिंग ठाकूर, (कर्णधार) प्रशंसा प्रकाश वाडीकर,तेजस्विनी गजानन काळे, श्रेया भास्कर गच्चे, पलक्षा गजेंद्र येरेकर, आदिती अमोल भागवत, श्रुती बालाजी बंगरवार, प्रीती प्रकाश वाडीकर , प्राची महेश ढोले आदी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली सदरील निवड चाचणी चे निवड समिती सदस्य म्हणून केंद्रीय विद्यालय चे क्रीडा शिक्षक रोहन गायकवाड शुभम पाडदे यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे सर क्रीडा अधिकारी संजय बेतिकर सर ,बालाजी शिरशीकर सर जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कूपटीकर लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल चे अध्यक्ष रवींद्र रेड्डी, मुख्याध्यापिका उज्वला राणे,प्रशिक्षक रविकुमार बकवाड आदीने शुभेच्छा दिल्या निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी नंदीग्राम रेल्वेने रवाना होणार आहे या संघासोबत प्रशिक्षक म्हणून रविकुमार बकवाड संघव्यवस्थापक म्हणून विशाल कांबळे हे असणार आहेत 

टिप्पण्या