सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सरनोबत हॉबेरा हॉटेलमधून सेवानिवृत्त*


------------------------------------------------------

नवी मुंबई सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्समध्ये राहणारे  सामाजिक कार्यकर्ते  चंद्रकांत गणपत सरनोबत हे ओबेरॉय हॉटेल मधून प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत.  त्यांचा माजी मंत्री व खासदार श्री. नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार झाला. 

१९८९ साली भारतीय कामावर सेनेच्या कमिटीत असताना गावातील  अनेक तरूण बेरोजगार युवकांना ओबेरॉय हॉटेलमध्ये  नोकरी देऊन मराठी माणसांना न्याय मिळवून दिला.  १९९०-९२  साली राममंदिर साठी कारसेवक म्हणून सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना १५ दिवस नैनि सेंट्रल जेलमध्ये कारावास झाला होता.  २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ओबेरॉय हॉटेल मधील गेस्टना बाॅम्बे हाॅस्पिटल मध्ये नेऊन उपचार करण्यासाठी प्रयत्न केले. त्याप्रसंगी त्यांनी रक्तदान केले.  गेली ५८ वर्षांच्या कालावधीत त्यांनी ३५  वेळा रक्तदान केलेले आहे. २००८  साली सीएसटी येथे झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला फाशी व्हावी म्हणून साक्षीदार राहुन पोलिसांना सहकार्य करून सामाजिक बांधीलकी दाखवली. चंद्रकांत सरनोबत हे उत्कृष्ट कबड्डी, हाॅलीबाॅल पट्टू आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात त्यांचा नेहमीच सहभाग  असतो.  २०१० पासून आजपर्यंत भाजपा प्रणित महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे ओबेरॉय हॉटेल मधील युनियनचे सरचिटणीस राहुन तेथील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न केले. 

  पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून नवी मुंबईतील सानपाडा-जुईनगर परिसरातील अनेक ठिकाणी विविध प्रकारची फळ झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण केले.त्यासाठी त्यांना महानगरपालिकेकडून सन्मानीत करण्यात आले. गावातील गोरगरीब,गरजूंना शिक्षणासाठी पुस्तक, वह्या,युनिफॉर्म, तसेच आर्थिक मदत देखिल केली आहे. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या