रामचंद्र घोगरे यांचे निधन

नांदेड/ प्रतिनिधी

वासुदेव समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी राम घोगरे यांचे वडिल व वासुदेव कलावंत रामचंद्र घोगरे यांचे दि. ३१ जुलै रोजी ९० व्या वर्षी निधन झाले. ते मूळचे मुखेडचे रहिवासी मात्र कालांतराने नांदेडला प्रोफेसर कॉलनीत स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे. त्यांत्या पार्थिवावर बुधवारी दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी वासुदेव समाजसेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष रामकृष्ण डोईजड, कार्याध्यक्ष बालाजीराव डोईजड, उपाध्यक्ष भारत शिंदे, कोषाध्यक्ष भारत चव्हाण, उपाध्यक्ष जगदीश उमरीकर, परभणीचे बालाजी डोईजड, राजाराम मुद्रटकर, दिगंबर मास्टर, मुखेडचे बालाजी रोडगे, राम डोईजड, राजू रोडगे, व्यंकट घोगरे,गोविंद घोगरे, प्रा.बालाघाटे, शिवाजी कुंभारकर, गणेश चव्हाण, दीपक डोईजड, आकाश कुंभारकर, नरसिंग घोगरे, तुळशीराम डोईजड, काशिनाथ सिंगणाथ, नागोराव ससाने, शिवाजी पेंढारकर, साईनाथ डोईजड, धर्माबादचे शिंदे आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
Popular posts
सूरज गुरव यांनी सांगितलेला प्रेरणादायी 'विद्यार्थीधर्म' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
रांची येथील राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत अद्या बाहेती ला रौप्य पदक*
इमेज
चार लेबर कोड विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची गरज*
इमेज
आंबेडकरी विचारांनी स्त्री-उत्कर्षाचा मार्ग सुकर — डॉ. संध्या रंगारी*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज