नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची एक दिवसीय पावसाळी सहल २८ जुलै २०२४ रोजी आसनगाव येथील माहुली गड जवळील श्री.गणेश फार्म हाऊस येथे गेली होती. या पिकनिकमध्ये संघाचे १०० ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या प्रवासादरम्यान शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक असे मानस मंदिर व तेथील नवसाला पावणाऱ्या नाग मंदिरात जाऊन सर्वांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर माहुल गडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य अशा वातावरणात असलेले श्री. गणेश फार्म हाऊस या ठिकाणी पोहचल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रिय कवी सुरज भोईर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यरत असणारी मैत्री संस्था व सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मैत्री संस्थेच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र व सामाजिक कार्यकर्ते किसनराव बोंद्रे, श्री गणेश फार्म हाऊसचे मालक व बांधकाम क्षेत्रातील विकासक भगवान विंधये, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, खजिनदार विष्णुदास मुखेकर, सहखजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्ष बळवंतराव पाटील, उपाध्यक्षा विजया गोसावी, कार्यकारणी सदस्य भानुमती शहा, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते तानाजी फणसे आदी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी दुपारचे शाकाहारी व मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेतला. या प्रवासादरम्यान सामाजिक कार्यकर्ते किसनराव बोंद्रे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक सभासदांचा गुलाबपुष्प व नाष्ट्याची पाकीट देऊन सन्मान केला.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा