वार्ताहर प्रतिनिधी दिनांक 19 जुलै 2024 रोजी नांदेडच्या सायन्स महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 बद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विषयातील विभागाबद्दल माहिती देण्यासाठी स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विषय तज्ञ म्हणून महाविद्यालयाचे प्रा डॉ डी आर मुंडे, व पीपल्स महाविद्यालयाचे प्रा डॉ सचिन पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण कसे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे व त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ विषयासोबत व्यावसायिक शिक्षण देखील कसे घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा व विविध विभागाबद्दल माहिती दिली. यानंतर आयक्युएसी प्रमुख डॉ सौ विभाती कुलकर्णी यांनी महाविद्यालयातील वुमन्स सेल व अँटी रॅगिंग पॉलिसी बद्दल माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील क्रीडा विभाग, ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एनसीसी विभाग याबद्दल माहिती देण्यासाठी अनुक्रमे डॉ अश्विन बोरीकर, प्रभारी ग्रंथपाल डॉ पी एस सुतकर, प्रा अविनाश घाडगे व संकेत उघडे उपस्थित होते. शेवटी विद्यापीठातील परीक्षा विभागातील बदलत्या स्वरूपाबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठातील परीक्षा विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक डॉ नागेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच प्रा श्रीकांत दुलेवाड यांनी सूत्र संचालन केले व डॉ उल्हास पत्की यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रो डॉ बी डी गचांडे, डॉ ए टी शिंदे, डॉ व्ही आर मराठे, डॉ वर्षा बोरगावकर, डॉ पी आर कुलकर्णी, डॉ के एस शिल्लेवार , डॉ एस एस मोदी, डॉ एस पी चव्हाण, प्रा आर एम आचेगावे, प्रा एम एम कदम, प्रा के के जाधव, डॉ व्ही आर नरवाडे, प्रा आर व्ही गावित, प्रा वाय आर रामा साने या सर्वांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा