व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी सप्तसुत्रांचा अवलंब करावा -श्री.भालचंद्र


नांदेड:(दि.२४ जुलै २०२४)

          श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत  महाविद्यालयातील  व्यक्तिमत्व विकास समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार

'युथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट' या विषयावर अभया फाउंडेशन, हैदराबादचे प्रमुख श्री. भालचंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

          याप्रसंगी बोलत असताना श्री. भालचंद्र यांनी, विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची सप्तसूत्री सांगितली.

त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःच्या लक्ष प्राप्तीसाठी

१) दक्ष असावे २) प्रामाणिक प्रयत्न करावे ३) स्वतःच्या कामात अद्वितीय असावे ४) विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असावा ५) आलेले संकट आणि समस्यांना पुढे जाण्यासाठी सदैव तयार असावे ६) कष्ट आणि मेहनत करण्यासाठी लाज बाळगू नये ७) लक्ष्य प्राप्त होईपर्यंत सदैव प्रयत्न सुरू ठेवावे.

          या सप्तसुत्रींचा अवलंब केला तर विद्यार्थ्यांना नेहमी यश मिळेल, याबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास देखील होईल; असे मत त्यांनी व्यक्त केले.

            याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे,

 समितीचे समन्वयक डॉ.डी.डी.भोसले,   प्रा.मीरा फड तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.डी.भोसले यांनी केले तसेच आभार देखील मानले.

टिप्पण्या