वडेपुरी प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय *राधाबाई गंगारामजी पाटील बोडके* यांचे आज सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिव देवावर आज सायंकाळी 5.00 वाजता वडेपुरी येथील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांच्या पश्चात श्री विठ्ठल गंगारामजी बोडके ज्येष्ठ चिरंजीव (सहशिक्षक) आणि श्री लक्ष्मण गंगारामजी बोडके कनिष्ठ चिरंजीव (सहशिक्षक तथा माजी उपसभापती- पंचायत समिती, लोहा) एक मुलगी- जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वडेपुरी गावातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री मुंजाजी पाटील बोडके यांच्या घराण्याच्या त्या सुनबाई होत्या.
अभियंता- ओमप्रकाश बोडके आणि सहशिक्षक श्री नामदेव बोडके यांच्या त्या काकू होत्या.
वडेपुरी आणि पंचक्रोशीत सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या बोडके घराण्यातील जेष्ठ नागरिक होत्या. त्यांच्या निधनाबद्दल माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दुःख व्यक्त केले.
तसेच वडेपुरी आणि परिसरातील आप्तस्वकीय, नातलग आणि परिचितांनी श्रद्धांजली वाहिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा