नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य* - प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे


नांदेड:( दि.१७ जुलै २०२४)

           नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय योग्य असून या धोरणाचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना भविष्यात होईल, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी व्यक्त केले.

          यशवंत महाविद्यालयात दि. १६ जुलै रोजी 'नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

           कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वा.रा.ती.म. विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्र.अधिष्ठाता डॉ. एम.के.पाटील यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे होते. 

         कार्यशाळेला रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी.आर.मुंढे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए. बशीर, अधीसभा सदस्य डॉ.अविनाश शिंदे, डॉ.वाय.एस.नलवार, डॉ.जमन अंगुलवार, डॉ.अभय बोंडगे, डॉ.नितीश कामीनवार, डॉ.शिवराज सिरसाट, डॉ. बी.एस.खाडे, डॉ.अनिल चिद्रावार, डॉ. सुरेश ढगे, डॉ.अनिलकुमार जाधव आदींची उपस्थिती होती.

         याप्रसंगी डॉ.एम.के.पाटील यांनी, नवीन शैक्षणिक धोरणावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

         पुढे बोलताना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल; तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर घडविण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.

           कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी स्वा.रा.ती.म.विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ.संगिता माकोने यांनी, नवीन शैक्षणिक धोरणानुसार रसायनशास्त्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादित केले. 

           चर्चासत्रात नवीन शैक्षणिक धोरण:२०२० नुसार बी.एस्सी. प्रथम वर्षाचा रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम, कौशल्य वृद्धिंगत अभ्यासक्रम, जेनेरिक इलेक्टिव्ह याची व्याप्ती, मर्यादा, दृष्टिकोन, अध्यापन आणि अध्ययनाचे निष्कर्ष, अनुभवजन्य अध्ययन पद्धती यावर संसाधकांनी सविस्तर चर्चा केली.

          कार्यक्रमात माजी विभागप्रमुख डॉ. महेश कळंबकर व महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रयोगशाळा सहायक श्री.जेठेवाड नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. विजय भोसले यांनी केले तर उद्घाटन सोहळ्याचे आभार डॉ.संभाजी वर्ताळे आणि समारोप सोहळ्याचे आभार डॉ. एस.व्ही.खानसोळे यांनी मानले. 

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.एस.पी.वर्ताळे, डॉ.एस.बी.जुन्ने, डॉ.एस.व्ही.खानसोळे, डॉ.के.एल.केंद्रे, डॉ.एम.डी.अंभोरे, डॉ.ए.एस.कुवर, डॉ.निलेश चव्हाण, डॉ.डी.एस.कवळे, प्रा.संतोष राऊत, स्नेहल पाटील, प्रा.शांतुलाल मावसकर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आर्दीनी सहकार्य केले.

टिप्पण्या