मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)

 

नांदेड : शहरातील देगलूर नाका भागातील मिल्लत नगर येथे किमान ३० वर्षांपासून नागरिक पक्के घरे बांधून वास्तव्यास आहेत. परंतु तेथे नागरी सुविधा अजूनही पोहचल्यात नाहीत.

दि.१८ मे रोजी लोकविकास समन्वय संघर्ष समितीचे समन्व्यक कॉ.उज्वला पडलवार आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथील नागरिकांनी बैठक घेऊन अनेक तक्रारिंचा पाढा वाचला.

प्रचंड घाणीचे साम्राज्य आणि महापालिकेची उदासीनता पाहता पावसाळापूर्व कामाना गती देणे आवश्यक आहे.

रिकाम्या प्लॉट्सवर कचऱ्याचे ढिगारे आणि सहन न होणारी दुर्गंधी ही रोगराईस निमंत्रण देत असून पहिल्या पावसातच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.ही सर्व परिस्थिती पाहता स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त मो.सादेक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने स्वच्छता निरीक्षक जियाओद्दीन खान यांना बैठकीच्या ठिकाणी पाठविले आणि सर्वासमक्ष पाहणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मिल्लत नगर येथे नाली,रस्ते, पाणी, लाईट,अंगणवाडी,शाळा, रेशन दुकान सह अनेक सुविधांचा अभाव असून दि.२२ मे रोजी लोकविकासचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे याना प्रत्यक्षात भेटून निवेदन देणार आहे.

या शिष्टमंडळात कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड यांच्यासह फरीन खान म. रहेमान खान, लतीफा बी, सलिमा बी, रमजानी बी, ताहेरा तबसूम, नूरजा पठाण, शहाणाज बेगम आदींचा समावेश असणार आहे.


टिप्पण्या