*नांदेड लोकसभा उमेदवारीसाठी ओबीसी प्रवर्गातून गंगाधर भांगे यांचे नाव चर्चेत...!*

देगलूर (प्रतिनिधी) नुकताच ८ मार्च रोजी भावसार चौक नांदेड येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ओबीसी प्रवर्गातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यानी ओबीसी प्रवर्गातून नांदेड लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भांगे, अविनाश भोसीकर यांचे नाव घोषित होताच तालुका व परिसरातील असंख्य एस.सी., ओबीसी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भांगे यांच्या नावाला अधिक पसंती दिली आहे

याबाबत अधिकचे वृत्त असे की, 

ओबीसींमधून आरक्षण मिळावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी यासाठी आता मराठा आंदोलकांनी वेगळाच पावित्रा घेतलाय. येत्या लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाचा उमेदवार घोषीत केले जाणार आणि प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. यास प्रत्युत्तर म्हणून ओबीसी बांधवांनी सुध्दा नांदेड लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवणार व "एकगठ्ठा" असंख्य ओबीसी समाज बांधव आपल्याच ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला मतदान करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत ओबीसीच्या मागण्या पोहचावेत यासाठी म्हणून ओबीसी प्रवर्गातील अभ्यासू व तज्ञ "दांडगा जनसंपर्क" असलेला उमेदवार म्हणून देगलूरच्या गंगाधर भांगे यांचे नाव नांदेड लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सोबत अविनाश भोसीकर यांचे नाव समोर येत आहे. अंतिम निर्णयावर कोणाच्या नावावर शि्कामोर्तब होईल हे स्पष्ट झाले नसले तरी तूर्त भांगे यांचे नावं अधिक चर्चेत आहे. भांगे यांनी ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील विविध तालुका व परिसरातील असंख्य ओबीसी समाज बांधवांना एका छताखाली आणण्याचे काम केले. माजी मंत्री भुजबळ यांनी मराठवाड्यात ओबीसींच्या बाजूने गाजविलेल्या सभेला मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांना एकत्रीत करून घेवून जाणे. खेडोपाडी जावून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर त्याचे भविष्यात होणारे परिणाम समजावून सांगून ओबीसी बांधवांना एकत्रित करणे, वारंवार आक्षेप अर्ज हरकती शासन दरबारी तक्रारीच्या रुपाने मांडून न्याय हक्कासाठी लढा देणे. वेळोवेळी जागोजागी सभा घेणे, यामुळे अनेक तालुक्यातील जिल्ह्यातील असंख्य नागरिकानी त्यांच्या कार्याची नोंद घेतली आहे. परिणामी आगामी काळात गंगाधर भांगे यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी बहाल केल्यास ओबीसीचा अभ्यासू व शांत संयमी उमेदवार म्हणून जनता त्यांच्या बाजूने कौल देईल यात काही शंका नाही. गंगाधर भांगे यांच्या नावाला अनेक ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पसंती दिली असून येणाऱ्या काळात गंगाधर भांगे यांना लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यास त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना निवडून आणू असेही मत ओबीसी जनतेतून व्यक्त होताना दिसून येते.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज