नायगाव प्रतिनिधी : नायगाव शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या वुमन्स हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे व भाजपचे नेते एकत्र आले होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहिम सेठ व भाजपचे बालाजी बच्चेवार यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला.
दि.११ मार्च २०२४ रोजी नायगाव येथे वूमन्स हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक केशवराव पाटील चव्हाण हे होते तर व्यासपीठावर हनमंतराव पा.चव्हाण (तंटामुक्ती अध्यक्ष),विजय पा चव्हाण (उपनगराध्यक्ष),सय्यद रहिमसेठ (माजी सभापती),पंकज पा.चव्हाण (नगरसेवक),सुधाकर पा.शिंदे (गटनेते), प्रदिप पाटील कल्याण,नंदा देशाई, डॉ शेख अनिस,संजय पा चव्हाण, शिवाजी पा वडजे,मोहन सावकार देमेवार यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी वुमन्स हॉस्पिटलच्या डॉक्टर निशात मॅडम व डॉ.जमील सय्यद यांना भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या हाती चोवीस तास रूग्ण सेवा घडावी असे म्हणाले तर यावेळी राजकीय कलगीतुराही रंगला कॉग्रेसचे सय्यद रहीम सेठ यांनी भाजपचे बालाजी बच्चेवार यांना उद्देशून म्हणाले की, आपल्या अपेक्षे प्रमाणे काही खालीवरी झाले तर लोकसभेसाठी आमच्या साहेबांना कॉंग्रस पक्षाचे टिकीट मिळण्याची शक्यता असल्याने नायगावकर म्हणून वसंतरावांना साथ द्यावे असे म्हताच जनसमुदायामधून टाळ्यांच्या कडकडाट झाला तर बालाजी बच्चेवार म्हणाले की,हे खरे आहे की अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्याने कॉग्रेस पक्षात वसंतराव चव्हाण यांचे वजन वाढले हि आनंदाची बाब आहे परंतु मी भाजपा कार्यकर्ता आहे हे तुम्हाला पण माहित आहे यामुळे असे वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही असे म्हणत वुमन्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या यावेळी
करीम चाऊस,भगवान पाटील कल्याण,सय्यद रियाज,सय्यद भाई,राजेंद्र कांबळे,गफ्फारभाई,अजीज टेलर यासह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जेष्ठ पत्रकार प्रकाश भाऊ हनमंते यांनी केले तर आभार डॉ.सय्यद जमील यांनी मानले
चौकट....
नायगाव शहरात प्रथमच वुमन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून मुस्लिम महिला डॉक्टर चौवीस तास रूग्णांना रूग्ण सेवा देत असल्याने सर्व स्तरातून डॉ.सौ.निशात जमील सय्यद (एम.बी.बी.एस.),व डॉ. जमील सय्यद यांचे अभिनंदन होत आहे

addComments
टिप्पणी पोस्ट करा