प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही... - डॉ. विद्या कुलकर्णी

भारतीय समाजव्यवस्थेत स्रियांना विषमतावादी वागणूक दिल्याने आपल्या समाजाची अधोगती झाली असून जोपर्यंत समाजाच्या सर्व क्षेत्रांत स्रियांचा सहभाग वाढत नाही, तोपर्यंत समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होणे शक्य नाही’ असे प्रतिपादन नाशिक येथील साहित्याभ्यासक डॉ. विद्या कुलकर्णी यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे होते. यावेळी उपकुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल, माध्यमशास्त्र संकुलाचे प्रा. डॉ. दिपक शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यापीठातील सफाई कर्मचारी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांनी स्रियांची प्रतिमा नकारात्मक दाखवून कौटुंबिक कलह, राजकारण करणारी स्री अशी प्रतिमा जनमानसात रुजवली, हे चुकीचे असून स्रियांनी परस्परांना समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सक्षम स्रीची प्रतिमा दाखविणे आवश्यक आहे. स्रियांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक असून आपल्या आवडीनुसार किमान एक तास स्वतः साठी खर्च करावा, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड, काळबा हनवते, डॉ. नितीन गायकवाड, संदीप एडके, प्रदीप बिडला, जनार्दन गोवंदे, ऋतुराज बुक्तरे यांच्यासह महिलांची लक्षनीय उपस्थिती होती. अध्यायसन केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज