*सर्व विभागांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा-अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांचे आवाहन*
नांदेड :- जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले त्यानुसार
महाराष्ट्र राज्यात सन १९९५ पासुन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले असुन मागील २५ वर्षापासुन सातत्याने पोलिओ निर्मुलनाकरीता मोहिम राबविण्यात येत असुन दरवर्षी प्रमाणे दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी महानगरपालिका हद्दीमध्ये पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे आणि त्यासोबतच अडल्ट बीसीजी लसीकरण व टीबीमुक्त शहर मोहिमेबाबत दिनांक ०१.०३.२०२४ रोजी नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. याप्रसंगी उपआयुक्त स.अजितपालसिंघ संघु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये प्रस्तावित पल्स पोलिओ लसीकरणाचे नियोजन, अडल्ट बीसीजी व्हॅक्सीनेशन बाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच सुरु असलेल्या टीबीमुक्त शहर मोहिमेचा आढावा घेण्यात आला. मोहिमेच्या दिवशी बुथवर व त्यानंतर शहरी भागात ५ दिवस घरभेटीचे नियोजन करण्यात येणार आहे, बैठकी दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी इतर विभागांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या या बैठकीस महापालिकेतील डॉ. बदिओद्दीन, डॉ. हनुमंत रिडे, डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर, डॉ. प्रतिभा कदक, डॉ. सुप्रिया पंडीत व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान डॉ. बदिओद्दी व डॉ. रिट्ठे यांनी मोहिमेचे सादरीकरण केले तर डॉ. बालाप्रसाद कुंटुरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा