अ.भा. ग्राहक पंचायतच्या तालुका अध्यक्षपदी गोपाळ मंत्री*

 *गंगाखेड (प्रतिनिधी)*   

शहरातील गीतामंडळ येथे दि.6 मार्च बुधवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक 

आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गंगाखेड तालुका अध्यक्षपदी गोपाळ मंत्री यांची निवड केल्याचे पत्र देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ.विलास मोरे यांनी दिले. ही निवड पुढील तीन वर्षासाठी असेल. यावेळी ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत च्या लीगल सेल प्रमुख ॲड.मीरा शेळगावकर, तालुकाध्यक्ष सोपानराव टोले,सेलू येथील गंगाधर कान्हेकर,नागोराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नवीन सदस्य नोंदणी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामध्ये तालुका , शहर ,महिला कार्यकारिणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. गंगाखेड तालुका अध्यक्षपदी गोपाळ मंत्री,उपाध्यक्षपदी निलावंती भुमरे,सचिवपदी सय्यद ताजुद्दीन,सहसचिवपदी अभिजीत पूर्णाळे,कोषाध्यक्षपदी महेमूद शेख,सहकोषाध्यक्षपदी नारायण घनवटे,संघटकपदी अँड.राजू देशमुख,महिला सदस्य अभिलाषा मंत्री,कोमल चिनके,परशुराम पापडू,वामन भुमरे, शहराध्यक्षपदी सुधाकर चव्हाण,उपाध्यक्ष माणिक बेद्रे,सचिव अँड.उत्तम काळे,सहसचिव वैजनाथ सोळंके,संघटक विजय पाटील,कोषाध्यक्ष डॉ.सचिन जोशी,सहसंघटक रमेश डहाळे, सदस्य मकरंद चिनके,राजकुमार मुंडे,तर महिला कार्यकारणी तालुकाध्यक्षपदी सीमा घनवटे,उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,सचिव सविता राखे, सहसचिव आशाताई रेघाटे,कोषाध्यक्ष शिल्पा वाघमारे,सहकोषाध्यक्ष अनिता भुमरे,कायदेविषयक सल्लागार अँड.केवळा कांबळे,छाया शिंदे,सदस्य सुशीला भुमरे,रमा भोसले,शेख शेहनाज आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिलाषा मंत्री यांनी केले तर आभार सय्यद ताजुद्दीन यांनी मानले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज