मतदार जनजागृतीसाठी ८ मार्चला युवती व महिलांची जनजागृती रॅली* *मोठया संख्येने सहभागी होण्याचे सिईओंचे आवाहन*

नांदेड, दि ६ :- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या जागृतीसाठी नांदेड शहरातून दिनांक 8 मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्‍यात येत असल्याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे.

      भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या निवडणुकांच्या जनजागृतीसाठी 8 मार्च रोजी सकाळी 7 वाजता वजिराबाद येथील महात्‍मा गांधी पुतळयापासून ही रॅली निघून महात्‍मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्‍या पुतळयाजवळ समारोप करण्‍यात येईल. 18 वय वर्षे पूर्ण झालेल्या मुली आता पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. सर्व तरुण मुलींनी स्वतःला प्रश्न विचारावा. मी मतदान का? आणि कशासाठी? आपणच विवेकाने विचार करावा या हेतूने या रॅलीचे अयोजन करण्‍यात आले आहे. या रॅलीला स्‍वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठाचे कुलगुरु एम.जी चासकर, जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, नांदेड-वाघाळा महानगरपालीकेचे आयुक्‍त महेशकुमार डोईफोडे, जिल्‍हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी शहरातील सर्व महाविद्यालयातील युवतींनी या रॅलीस सहभागी व्‍हावे,असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. 

      जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी युवती व महिलांनी प्राधान्याने या मोहिमेत पुढाकार घ्यावा, पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणा-या तरुणींनी स्वतःला प्रश्न विचारावा. Why will i vote ( व्हाय विल आय व्होट )? का? कशासाठी? आपणच विवेकाने विचार करा आणि आपले मत 1 मिनिटाच्या व्हिडिओत व्यक्त करावे. तसेच #WhyWillIVote या हॅशटॅगसह twitter, facebook, Instagram सोशल मीडियावर पोस्ट करतांना व जिल्हा परिषद नांदेडचे अधिकृत ट्वीटर अकाऊंट @CeoNanded याला Tag करण्यात यावे. उत्कृष्ट मत नोंदविणा-या युवतींचा गौरव करण्‍यात येणार आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज