*यशवंत युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न


 नांदेड दि.६ मार्च २०२४) 

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव:२०२४ मध्ये दि.६ मार्च रोजी पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

            स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्पर्धेचे परीक्षक सायन्स कॉलेजचे डॉ.डी.आर.मुंडे आणि डॉ.बी.डी. गचांडे, दत्त महाविद्यालय, हदगावचे डॉ.संजय जाधव आणि योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमतचे डॉ.काशिनाथ चव्हाण होते.

           याप्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सवाचे समन्वयक डॉ.संजय ननवरे आणि पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे समन्वयक डॉ.नीरज पांडे होते.

           प्रारंभी डॉ.संजय ननवरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.डी.आर.मुंडे यांनी मनोगतात म्हटले की, पूर्वी जुनी शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. नंतरच्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण कोठारी कमिशनच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले. २०२० पासून नवीन शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्वीची शिक्षणपद्धती रोजगार निर्मिती करण्यास अक्षम होती, म्हणून कौशल्यावर आधारित आधुनिक पद्धती; ज्याद्वारे रोजगार निर्मिती होईल; ती स्वीकारण्यात आली. या पद्धतीतून 'रोजगार मागणारे न बनता रोजगार देणारे बना' हे तत्व स्वीकारण्यात आलेले आहे.

          अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी सर्व स्पर्धकांना स्पर्धेकरिता आणि भविष्यकालीन यशस्वीतेकरिता शुभेच्छा दिल्या.

            स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ.नीरज पांडे, सदस्य डॉ. शिवराज बोकडे, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.मदन अंभोरे, डॉ.डी.डी.भोसले, डॉ.धनराज भुरे, डॉ.राजरत्न सोनटक्के, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, गोविंद शिंदे, किसन इंगोले, डी.आर .टर्के, माणिक कल्याणकर, बी.एल.बेळीकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

            सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. शिवराज बोकडे यांनी केले तसेच आभार देखील मानले.

          या स्पर्धेसाठी जवळपास ११५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांना उत्साहीत करण्यासाठी डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ. विजय भोसले, डॉ.एम.ए.बशीर, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.एस.बी.वानखेडे, डॉ. कविता केंद्रे, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे) प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.मोहम्मद आमेर, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. बालाजी भोसले, डॉ.संजय जगताप, डॉ.संदीप पाईकराव, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा. माधव दुधाटे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज