सप्तफेरे सेवाभावी संस्था व सप्तफेरे वधूवर सुचक केंद्राचा गुणगौरव सोहळा संपन्न प्रत्येकाने सज्जनाची संगत करावी ः डॉ.विठ्ठल लहाने

 


संजय राजुळेंसारख्या ध्येयवेड्या व्यक्तींची समाजाला आज खरी गरज-प्रा.शिवराज मोटेगावकर

लातूर : सप्तफेरे सेवाभावी संस्था व सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कार्याची दखल घेवून त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करून अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. अशाच प्रकारचा सन्मान सोहळा ते गेल्या 12 वर्षापासून करत आहेत. लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून आरसीसीचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दापका ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा माजी सभापती व्यंकटराव पाटील दापकेकर, वृक्षासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे सुपर्ण जगताप व टाईम्स नाऊचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील यांची तर लातूरातील सुप्रसिध्द उद्योजक द्वारकादास शामकुमारचे मालक तुकाराम पाटील, बांधकाम व्यवसायिक नागनाथ गिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळीसंजय राजुळे म्हणाले की, आपण आपल्या कमाईचा एक हिस्सा समाजातील सामाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतोत आणि तो माझा छंद आहे. मी माझे हे कार्य असेच पुढेही चालूच ठेवणार असुन समाजातील चांगल्या व्यक्तींचा सन्मान केल्याने त्या व्यक्तींना प्रेरणा भेटते व अशाच प्रकारचे कार्य मी गेल्या 2005 पासून करत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल लहाने यांनी सज्जनांचे संगोपन करायला हवे असे ठासून सांगत उत्तम चारित्र्य, संस्कारमय जीवन व शिस्तबद्ध आयुष्य घडविण्यासाठी समाज घडवणार्‍या सज्जनांचे संगोपन करा असे सांगितले. आजकाल चांगली बोलणारी, वागणारी माणसे फार कमी आहेत आणि अशी माणसे समाजासमोर आणण्याचे काम सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्र करत असल्याचेही ते म्हणाले. माणसाने संगत ही सज्जनाची करावी. चांगल्या माणसांच्या संगतीत माणुस राहिला तर माणसाच्या जगण्याचे सार्थक होते. सप्तफेरे वधूवर सुचक केंद्राच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार हे अशाच चांगल्या व्यक्तींना दिले जातात हे पहात आहे. संजय राजुळे या माणसाला सामाजिक कार्य करण्याचा छंद असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले तर आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी संजय राजुळे हे अथक परिश्रम करणारे, निस्वार्थ भावनेने कार्य करणारे व्यक्ती असुन ते नेहमीच आडल्या-नडलेल्यांना मदत करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले तर पुढच्या वर्षी आणखी थाटामाटात अशाच समाजातील चांगल्या व्यक्तींचा सन्मान करतील अशी आशा प्रा.शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केली. तर संजय राजुळें सारख्या व्यक्तींची आज समाजाला गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी दापक्याचे सरपंच व्यंकटराव पाटील दापकेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर वृक्षमित्र सुपर्ण जगताप यांनीही प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी. वृक्ष लागवड करणे किती गरजेचे आहे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 20 व्यक्तींना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उमेश खोसे, वैष्णवी वाघ यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव तरगुडे, विरभद्र तरगुडे, बालाजीअप्पा पिंपळे, गंगाधर डिगोळे, रविकिरण सुर्यवंशी, लहु शिंदे, विद्यासागर पाटील, संतोष सोनवणे, अमोल घायाळ, गुरुराज माळेवाडे, साईनाथ घोणे, शंकर हामपल्ले, अमित खराबे आदींनी परिश्रम घेतले. सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक सचिव माधव तरगुडे यांनी सर्वांचे आभार मानले.  


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज