यशवंत पंचायत राज अभियान सन 2020-21चा
विभाग स्तरावरील द्वितीय पुरस्कार नांदेड पंचायत समिती ला प्राप्त झाला आहे.स्मृतीचिन्ह, रोख आठ लाख रुपयेचा धनादेश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर येथे दि 4 मार्च 2023 रोजी सन्मानित करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक आदींचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अभिनंदन केले आहे.
वेळी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर, अनमोल सागर ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर , सुरेश बेदमुथा उपायुक्त विकास छत्रपती संभाजी नगर, डॉ. सीमा जगताप सहाय्यक आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांची प्रमुख उपस्थिती होती .
या प्रसंगी नांदेड पंचायत समिती चे गटविकास अधिकारी पी के नारवटकर, यु डी तोटावार (बिडीओ वसमत) , विस्तार अधिकारी विठ्ठल कांबळे , गोविंद मांजरमकर, सतीश लकडे , भगवान वडजे , ग्रामविकास अधिकारी शिवराज तांबोळी आदींच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यशवंत पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ एन आर केंद्रे, डॉ सुधीर ढोंबरे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. नांदेड पंचायत समितीच्या यशाचे जिल्हा परिषद वर्तुळात अभिनंदन होत आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा