गत विधानसभा निवडणुकीतील वंचितचे उमदेवार नामदेव आईनवाड यांचा भाजपात प्रवेश माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

नांदेड : प्रतिनिधी

बहुजन समाजाचे नेते व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भोकर मतदार संघातील वंचितचे उमेदवार नामदेव आईनवाड यांनी आज दि. ०३ रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

नामेदव आईनवाड यांचे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठे सामाजिक कार्य आहे. गोल्ला-गोलेवार समाजातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी व या समाजाच्या उन्नतीसाठी ते नेहमीच अग्रेसर असतात, यासोबतच त्यांनी ओबीसी चळवळीत स्वत: झोकून दिले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी निवडणुक लढविली होती. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भोकरसह नांदेड जिल्ह्याचा विकास होत आहे. अशा या विकास प्रवाहात आपलाही सहभाग असावा या हेतुने त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर, माजी नगरसेवक संजय आऊलवाड, बी.के.पाटील कोटेकल्लूरकर , यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज