संशयित महिला मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील घटना.


 वडगाव/पोटा वार्ताहर....

हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील रहिवासी सौ.अनिता दत्ता जळपते वय वर्ष 46 या महिलेचा दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी रात्री आठ वाजता शेतामध्ये संशयित मृतदेह आढळून आल्याने घडलेल्या घटनेबद्दल मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात एका आरोपी विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल झाला.

पोटा बुद्रुक येथील रहिवासी अनिता दत्ता जळपते वय 46 वर्ष ही दिवसभर आपल्या शेतात आपल्या मोठ्या मुलासोबत काम करीत होती परंतु रात्र झाली असतानाही ती घरी न परतल्याने तिचा पती दत्ता दळपते यांनी शेतामध्ये धाव घेऊन पाहिले असता आपली पत्नी मृता अवस्थेत शेतात पडून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने तो तातडीने गावात येऊन घटनेचे वृत्त सर्वांना कळवले तेव्हा गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बघण्यासाठी तोबा गर्दी केली होती घटनेचे वृत्त संबंधित मृत महिलेच्या भावांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक जऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदय व बीट जमादार पाटील यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवइच्छेदनासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

मृत महिलेचा भाऊ मारुती संभाजी चिंतलवाड राहणार वारंग टाकळी तालुका हिमायतनगर यांनी दाखल केलेले फिर्यादीमध्ये आरोपी सचिन उर्फ गजानन दत्ता यांनी माझ्या बहिणीचा दगडाने ठेचून खून केला असा आरोप केला आहे पूर्वीही त्यांनी माझ्या बहिणीला शॉर्ट सर्किट लावल्यांचे माझ्या बहिणीने मला सांगितले होते असे लेखी निवेदनात नमूद केल्याने यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदय व बिट जमादार पाटील हे पुढील तपास करीतआहेत.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज