नांदेड प्रतिनिधी,
नांदेड येथील युवा नेते पप्पू पावडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे.
राज्यात बदलते राजकीय समीकरणे लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे.
राज्यातील शेतकरी, शेतमजूर, वंचित, पीडित व बहुजन घटकाला न्याय देण्याची भूमिका केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा घटक पक्ष राहणार असून सामान्यांच्या हितासाठी लढणारा एकमेव नेता व एकमेव पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. असे पप्पू पावडे यांनी सांगितले आहे.
पप्पू पावडे हे नांदेडच्या राजकारणातील सक्रिय युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर विधानसभा अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी काही वेळ शिवसेनेत देखील काम केले आहे. शिवसेनेकडून त्यांनी वाडी पंचायत समिती गणातून निवडणूक लढविली होती. अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला असला तरी चळवळीतील एक उमदं नेतृत्व म्हणून पप्पू पावडे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान राज्यात सुरू असलेल्या एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक 7 मार्च रोजी मुंबई दादर येथील आंबेडकर भवन येथे असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा महासचिव श्याम कांबळे यांची उपस्थिती होती.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर हत्तीअंबीरे पालमकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांनी प्रवेशाचे कौतुक करताना मार्गदर्शन व अभिनंदन केले आहे.
त्यांचे समवेत संदीप पावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भगवान गोविंदराव कंधारे, चर्मकार समाजाचे नेते गोपाळ सोनटक्के, मातंग समाजाचे युवा नेते गणेश दाढे यांनीही वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे.
येणाऱ्या काही दिवसात एका विशेष कार्यक्रमात पप्पू पावडे यांचे शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा