नांदेड/ प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी त्यांच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजिनामा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. पक्षामध्ये प्रामाणिक काम करू नही, न्याय देत नसल्यामुळे त्यांनी हा राजिनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खा. शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कमलकिशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक दशकापासून प्रभावी पणे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हरीहरराव भोसीकर यांनी सांभाळली. जिल्ह्यामध्ये यापुर्वीच्या जिल्हाध्यक्षा पैक्षा पक्ष संघटन वाढवले प्रदेश वरून आलेले सर्वच कार्यक्रम राववून जिल्ह्यात पार्टी वाढवली असे असतांना नांदेडच्या पक्ष निरीक्षक आशा ताई भिसे आणि प्रदेश सरचिटणिस रवींद्र पवार यांनी वरीष्ठ मंडळीची दिशाभूल केली त्यामुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याचे कारण पुढे करत त्यांनी प्रदेश अध्यक्षाकडे राजिनामा दिला आहे. विशेष म्हणजे भोसीकर यांनी नाराजी संदर्भात वरीष्ठांना कळवली होती. तरी ही प्रभावी काम करत असतांना मध्येच अडथळे येत होते सर्व बाबीेंचा विचार करून त्यांनी राजिनामा दिला आहे. लवकरच ते त्यांची भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान भोसीकर यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे पक्ष संघटन वाढविले आहे आता त्यांच्या या राजिनाम्याने पक्षाला मोठी खिंडार पडणार आहे. अनुभवी नेता तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट स्टेट हाऊसिंग फायन्सचे ते संचालक आहेत. त्यांच्या अशा अनुभवी नेत्यांचा राजिनामा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला परवडणार नसल्याचे बोलले जात आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा