नांदेड, दि.१ (प्रतिनिधी) ः हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते १२ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यामध्ये निवघा बाजार मार्केट कमिटी मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नालीचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी ५० लाख रुपये आणि निवघा ते कोहळी सिमेंट रस्ता व डांबरीकरण करणासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.01) नाली बांधकामाचे व सिमेंट रस्ता व डांबरीकरण रस्त्याच्या १२ कोटी ५० लाख रूपयाच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर, मा.सदस्य संभाराव लांडगे, शिवसेना हदगाव तालुका प्रमुख विवेक देशमुख, मा.सभापती बाळासाहेब कदम, युवासेना जि.प्रमुख संदेश पाटील, निवघा नगरीचे सरपंच शेख इस्माईल भाई, रमेश दादा राठोड, माजी सरपंच शरद पाटील, व्यापारी अनंतराव जैन, शिवसेना उप ता.प्रमुख बाबुराव काळे, मारोतराव सूर्यवंशी, बबन माळोदे, शितल भांगे, भास्कर कदम, वसंतराव निर्मल, सुदर्शन पाटील, अमोल कदम, शिवाजी देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हदगाव तालुक्यातील निवघा बाजार समिती ही मतदारसंघातील मोठी बाजारपेठ आहे. येथील मार्केट कमिटीमध्ये परिसरातील व आजूबाजूच्या गावाच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्री येत असतो. परंतु अनेक वर्षांपासून मार्केट कमिटीमधील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून न जाता आडत दुकानांमध्ये पाणी शिरुन शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान होत असे, खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने आज मार्केट कमिटी मधील दोन्ही बाजूंच्या नाल्यांचे बांधकामासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या पुढील काळात शेतकरी आणि व्यापारी यांच्या मालाचे कुठलेही नुकसान होणार नाही.
दुसरीकडे कोहळी ते निवघा गावाला जाण्यासाठी पांदन रस्ता होता. विशेष म्हणजे निवघा येथे शेवंता मातेचे प्रसिद्ध देवस्थान आहे. शेवंता मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. कोहळी ते निवघा रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने या रस्त्यावरील दहा गावांचा प्रश्न सुटला असल्याची जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी भावना व्यक्त केली

addComments
टिप्पणी पोस्ट करा