नांदेड : दि.४ अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण यांचा अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मा. खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की, मी जगात फिरत असताना विविध गोष्टी पाहण्याचा योग आला. त्यात जे चांगलं आहे ते आपल्या नांदेडला आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे ते म्हणाले शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता बदल होत आहेत. या बदलाच्या पार्श्वभूमीवर आपणही शैक्षणिक बदल स्वीकारून नव्या बदलास सामोरे गेले पाहिजे. एवढेच नाही तर जगातले वेगवेगळे विद्यापीठे महाराष्ट्रात येऊ घातलेले आहेत. अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संचालक मंडळ यांच्या समोर मोठी आव्हाने आहेत. ही आव्हाने असले तरी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय हे एक नामांकित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने शैक्षणिक नीतिमूल्ये जपलेली आहेत. असे म्हणून संचालक मंडळ, प्राध्यापक, व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे हे होते. ते म्हणाले, आमच्या महाविद्यालयात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. फक्त अशोकरावांचा येण्याचा योग आला नव्हता. तो आज आला. आम्ही पक्ष पातळीवर विरोधी भूमिकेत होतो परंतु विधायक कार्याला कधीही आम्ही विरोध केला नाही. आता देशपातळीवर काम करण्याची संधी मिळावी ही भावना व्यक्त करुन मा. अशोकराव चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी मा. आ. अमरभाऊ राजुरकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य सुधीर शिवणीकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा शैक्षणिक व सांस्कृतिक आढावा घेतला.
याप्रसंगी व्यासपीठावर अभिनव भारत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्षा डॉ सविता भालेराव, कोषाध्यक्ष कैलासचंदजी काला, सहसचिव धनंजय जोशी, सदस्य गजानन कुलकर्णी, ऊपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, उपप्राचार्य श्री अजय संगेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष कोटुरवार यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. गिरीश पांडे यांनी मानले.
याप्रसंगी नांदेड शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने ऊपस्थित होते.
डॉ.जान्हवी शिउरकर यांच्या वंदे मातरम् या गीतगायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

addComments
टिप्पणी पोस्ट करा