*शाश्वत विकासाची ध्येय केंद्रबिंदू मानून प्रत्येक उपक्रम अंमलात आणावा* - प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

नांदेड:(दि.५ मार्च २०२४)        शाश्वत विकास हा देशातील प्रत्येक घटकासाठी अत्यावश्यक आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांनी शाश्वत विकासाची ध्येय केंद्रबिंदू मानून प्रत्येक शैक्षणिक, शिक्षणपूरक उपक्रम अंमलात आणावा; असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.

           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत यशवंत महाविद्यालयात 'यशवंत वार्षिक युवक महोत्सवा'च्या 'शोधनिबंध सादरीकरण' स्पर्धेच्या उद्घाटन समारोहात ते बोलत होते.

           या प्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, युवक महोत्सव समन्वयक डॉ.संजय ननवरे यांची उपस्थिती होती.

           मानव्यविज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील एकूण जवळपास ९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

           या स्पर्धेचे परीक्षण पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.मोहन रोडे, प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील डॉ.निळकंठ पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे संचालक डॉ.एस.पी. चव्हाण आणि स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसचे डॉ.काशिनाथ भोगले यांनी केले.

           या स्पर्धेचे समन्वयक डॉ.एम.एम. व्ही.बेग, सदस्य डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.अजय मुठे, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.मोहम्मद आमेर, डॉ.नीताराणी जयस्वाल आणि डॉ.श्रीकांत जाधव होते.

           स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, गोविंद शिंदे, किसन इंगोले, डी. आर.टर्के, माणिक कल्याणकर, बी.एल. बेळीकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

           दुपारी दोन ते पाच दरम्यान क्रीडा स्पर्धेमध्ये बास्केटबॉल स्पर्धेत एकूण जवळपास १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण सायन्स कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.अश्विन बोरीकर यांनी केले. 

          क्रीडा स्पर्धेचे समन्वयक डॉ. मनोज पैंजणे, सदस्य डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.रामराज गावंडे, डॉ.एस.एम. दुर्राणी,डॉ.बालाजी भोसले, डॉ.कविता केंद्रे, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, प्रा.ए.आर.गुरखुदे, प्रा.उत्तम केंद्रे होते.

           सूत्रसंचालन प्रा.भारती सुवर्णकार यांनी केले तसेच आभार देखील मानले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज