यशवंत महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञानावर आधारित वाय.एम.आय. टी. फेस्ट २०२४ उत्साहात संपन्न*


नांदेड:(दि.१ मार्च २०२४)

           संगणकशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालयातर्फे आयोजित वाय.एम.आय.टी. फेस्ट २०२४ हा विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम दि. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाला. या अंतर्गत पोस्टर प्रेसेंटेशन, एच.टी.एम.एल. व एक्सटेंपर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

          या स्पर्धेमध्ये विद्यापीठ परीक्षेत्रातिल विविध महाविद्यालयातून १६० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. दि. २६ फेब्रुवाऱी रोजी उद्घाटन सोहळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र -कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

          याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नवी क्षितिजे व त्यांचा भारताच्या प्रगतीमध्ये उपयोग, यावर प्रकाश टाकला.

               प्रारंभी उपक्रमाचे सचिव डॉ.श्रीकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले तर विभागप्रमुख प्रा.नितीन नाईक संगणकशास्त्र विभागाची माहिती स्पर्धकांना देत असताना म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माहितीबरोबर आधुनिक युगात अध्यात्मही महत्वाचे आहे.

           सोहळ्याचे सूत्रसंचालन कु.शितल मोरे व कु.शुभांगी मिटकरी यांनी केले तर आभार कु.वैशाली पवार यांनी मानले.

           दुपारच्या सत्रात पोस्टर प्रेसेंटेशन व एच.टी.एम.एल. प्रोग्रामिंग या स्पर्धा संपन्न झाल्या. 

          स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.सुनील डहाळे व डॉ यु.एस.पत्की यांनी भूमिका पार पाडली.

          दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात एक्सटेम्पर स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे परीक्षण आय.टी.एम महाविद्यालयाचे डॉ.माधव बोकारे यांनी केले.

            पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धेमध्ये यशवंत महाविद्यालयातील ओमकार पांचाळ व पियुष शिंदे यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक एन.आय.आय.टी कॉलेजची विद्यार्थिनी नाबा सिद्धीका तसेच तृतीय क्रमांक आय.टी.एम. महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ मोटेवार याला प्राप्त झाले. 

          एच.टी.एम.एल. प्रोग्रामिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक एमजीएम कॉलेजचा श्रीकांत ढवळे, द्वितीय क्रमांक आय.टी.एम. महाविद्यालयाच्या शैली घाटे तसेच तृतीय क्रमांक महात्मा गांधी कॉलेज, अहमदपूर च्या अमोल शेळके या विद्यार्थ्याने पटकावले. 

          अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या एक्सटेम्पर या स्पर्धेत सिद्धी फुरकान माज हा आय.टी.एम.चा विद्यार्थी प्रथम, एमआयटी कॉलेज, वसमतचा सतीश जोंधळे द्वितीय तर सुमित ठाकरे हा यशवंत महाविद्यालयाचा विद्यार्थी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. 

           समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

           समारोपाच्या सोन्याचे सूत्रसंचालन कु.साक्षी बोडलवार व कु.सुषमा लाडेकर यांनी केले तर आभार कु.सृष्टी गुप्ता मानले.

          स्पर्धेच्या यशस्वी तेसाठी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, विभागप्रमुख प्रा. नितीन नाईक, उपक्रम सचिव डॉ.श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती सदस्य शुभांगी मिटकरी, वैष्णवी टरके, निशीगंधा राउत, वैशाली पवार, शीतल मोरे, सुषमा लाडेकर, साक्षी बोड़लवार, वैष्णवी श्रीमंगले, सृष्टी गुप्ता, शीतल सोनटक्के, दुर्गेश चव्हाण, वीरेश चापळे, चैतन्य कुलकर्नि , मुद्सिर, सुमित ठाकरे, शैलेश माने व डॉ.पी.बी.पाठक, प्रा.एस.एम.शिंदे, प्रा.एस.ए.भुसारे, प्रा.जी.बी.चौसटे, प्रा.पि.बि.तामसेकर, प्रा.अमरीन खान, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल. व्ही. पदमाराणी राव, संशोधन विकास समिती समन्वयक डॉ.एम.एम.व्ही.बेग, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, सचिन वडजे, माणिक कल्याणकर, प्रणवी काकडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या