लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 984 दावे निकाली !

 

लातूर, दि. 5  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने लातूर जिल्हा सत्र न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे 3 मार्च, 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 984 दावे निकाली काढण्यात आले.

मोटार अपघातनुकसान भरपाई प्रकरणेकौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणेभू-संपादन, 138 एन.आय.ॲक्टकौटुंबिक हिंसाचार प्रकरणेलवादहिंदू विवाह कायद्यातंर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये सर्व बँकाचे वसुली दावेवित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुलीबाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विमा कंपन्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शोरन्स कंपनीकडील एका 45 लाख रुपयामध्ये तडजोड करण्यात आली. या प्रकरणात अर्जदाराचे वकील ॲड. ए. एस. बावणे आणि ॲड. जी. के. सुरवसे व प्रतिवादीचे वकील ॲड. एस.जी. डोईजोडे यांनी काम पाहिले. या पॅनलवर पॅनल लातूर प्रमुख जिल्हा न्यायाधीश-3 पंच म्हणून ॲड. एस. डी. लखादिवे यांनी काम पाहिले. तसेच इतर इन्शोरन्स कंपन्यांचे वकील यांनी राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच 2023 मध्ये कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेला दावा तडजोडीअंती निकाली काढण्यात आला. या  प्रकरणात ॲड. बी. पी. शिवलकर यांनी काम पाहिले . या पॅनलवर पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश -2 एस. टी त्रिपाठी आणि पॅनल पंच ॲड.  कल्पना एम. भुरे यांनी काम पाहिले.

तसेच या लोक अदालतीमध्ये पॅनलवर ॲड.  कल्पना एम. भुरेॲड.  एस. डी. लखादिवेॲड.  संध्या बी. जोशीॲड. अझरुद्दीन मनियारॲड.  शिवकुमार जी. क्षिरसागरॲड.  सुनैना (ठाकूर) बायसॲड.  राधा जी. वाघमारेॲड.  एस. व्ही. सलगरे यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले. तसेच लोकअदालत यशस्वी करण्यासाठी पक्षकारविधीज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही.व्ही. पाटीलसर्व न्यायीक अधिकारीजिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव एस. डी. अवसेकरबार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्य ॲड. अण्णाराव जी. पाटीलजिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष ॲड. महेश बामनकरउपाध्यक्ष गजानन यु. चाकुरकरसचिव ॲड.  प्रदिपसिंह टी. गंगणेमहिला सचिव हर्षला जी. जीशी व इतर पदाधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील मंडळ लातूर व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज