अशोक चव्हाण यांच्या हाती आदर्श कमळ काँग्रेस मधील अशोक पर्व संपले

नांदेड विशेष प्रतिनिधी

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळातील अर्थव्यवस्थेबद्दल मोदी सरकारने श्वेतपत्रिका काढली आणि त्यात महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याचा ओझरता उल्लेख आला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचा ही राजीनामा दिला अशोक चव्हाणांच्या राजीनामामुळे काँग्रेस मधील अशोक पर्व संपले भाजपामध्ये झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला 

हेडमास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा घेऊन अशोक चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्रीपद गाठले अशोक चव्हाण यांच्या कार्याची महती सांगण्यासाठी त्यावेळी अशोक पर्व या विशेष पुरवण्या कोट्यावधी रुपये खर्चून काढण्यात आल्या अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक डॉक्टर माधव किना़ळकर यांनीही प्रकरण चर्चेत आणलं. अशोक चव्हाण यांच्या उधळलेल्या वारूला आदर्शने ब्रेक लावला भाजपने हे प्रकरण एवढे तापवले की अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला 

1987 मध्ये अशोक चव्हाण पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले नांदेड मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांनी प्रभुत्व निर्माण केले 2014 च्या मोदी लाटेतही काँग्रेसच्या निवडून येणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता 2017 मध्ये झालेल्या नांदेड महापालिकेत त्यांनी काँग्रेसला 81 पैकी 73 जागा मिळवून दिल्या 2019 मध्ये त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले याच वर्षी अशोक चव्हाणांना पराभवाचा पहिला धक्का बसला भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी त्यांना पराभूत केले 2019 च्या विधानसभेत त्यांनी नांदेड आतून काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तसेच महसूल खाते होते 

▪️ना ' ना  करते मैं प्यार कर बैठा .......

गेल्या वर्षी जुलैमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात अशोक चव्हाण यांनी आपण आयुष्यभर काँग्रेस सोडणार नाही असं जाहीर केलं होतं अधून मधून अशोक चव्हाण भाजपा मध्ये जाणार असल्याच्या अफवा उठत होत्या पण त्यांना कधी त्यांचा इन्कार केला नाही आयोधीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अशोक चव्हाणांचे फलक झळकले आणि सगळ्यांच्याच भुवाया उंचावल्या नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात भाजपच्या नेत्यांना डावलून अशोक चव्हाण यांच्या कारखान्यांना एक से सदतीस कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आले त्यावेळीही त्यांच्या काँग्रेस सोडण्याची चर्चा झाली परंतु मोठ्या खुबीने त्यांनी त्याला बगल दिली. मात्र मोदी सरकारची श्वेतपत्रिका आली आणि अशोक चव्हाण अंतरबाह्य 

हादरून गेले आज सकाळी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे काँग्रेस मधील अशोक पर्व असताला गेले

▪️काँग्रेसचे बॅनर हटवले 

मुंबई येथे मंगळवारी दुपारी अशोकराव चव्हाण यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला यानंतर तातडीने नवा मोंढा भागात असलेल्या काँग्रेस कार्यालय परिसरात लावलेले आणि शहरात काही ठिकाणी असलेले काँग्रेस तथा अशोकराव चव्हाण यांचे बॅनर हटवण्यात आले

▪️अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नव्हे गाढे 

कोणताही व्यक्ती म्हणजे पक्ष नसतो तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस पक्ष नव्हे ते भाजपात गेले याचं दुःख आहे परंतु जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असा दावा काँग्रेसचे राज्य प्रवक्ता बालाजी गाढे यांनी केला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मंगळवारी दुपारी तातडीने पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपला असा अर्थ होत नाही काँग्रेस ही लोक चळवळ आहे विचार आहे तो कधीही संपणार नाही अशोकराव भाजपात गेले यांचे दुःख आहे ज्येष्ठ नेते कैलासवासी शंकरराव चव्हाण आज हयात असते तर त्यांनाही या निर्णयाने दुःख झाले असते जिल्ह्यातील आणखी काही आमदार पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत काही लोक जातील याबद्दल शंका नाही

▪️अशोकरावामुळे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील खतगावकर 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत अशोकरावाकडे विकासाची दूरदृष्टी आहे त्यांच्या भाजपात जाण्यामुळे मराठवाडा व नांदेड जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील त्यांच्या भूमिकेला आमचे समर्थन आहे अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अशोकराव चव्हाण यांच्या प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणकोणते नेते आमदार पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत याची सध्या जोरदार चर्चा होत आहे यात सगळ्यांचं लक्ष माजी खासदार आणि नात्याने भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे लागले होतं या पार्श्वभूमीवर माजी खासदार खतगावकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला

▪️अन चव्हाणांनी खासदार चिखलीकरांचा हात धरला 

मुंबई येथे भाजप पक्ष कार्यालयात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला त्यावेळी त्यांच्या बाजूला चव्हाण व मध्यभागी खासदार प्रताप पाटील चिखलीकर तर त्यांच्या बाजूला अमरनाथ राजूरकर बसले होते दोघांच्या मध्ये पुन्हा प्रताप पाटील बसल्यामुळे नांदेडमध्ये चर्चेला उधाण आले भाजपात प्रवेश झाल्यानंतर चव्हाण यानी तात्काळ भाजप सदस्य पदाची पावती फाडत बावनकुळे कडे पैसेही दिले प्रवेशानंतर सर्वांनी एकमेकांचा हात धरून उंचावला त्यावेळी खासदार चिखलीकरांचा हात राजूरकरांच्या हाती होता परंतु चव्हाण यांच्या हाती नव्हता हे लक्षात आल्यानंतर चव्हाण यानी तात्काळ खासदार चिखलीकरांचा हात धरून उंचावला त्यामुळे अखेर चव्हाण यांनी खासदार चिखलीकरांचा हात धरल्याने याची चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे

टिप्पण्या