अर्धापुरात काँग्रेसला खिंडार खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारों कार्यकर्ते भाजपात

नांदेड दि.२७ अर्धापुर तालुक्यातील काँग्रेसच्या हजारो प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मनपाच्या ५५ माजी नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील बहुतांश काँग्रेस महिला पदाधिकारी ,माजी महिला लोकप्रतिनिधी यांनी भाजपात प्रवेश केला होता आता तिसऱ्या दिवशी अर्धापूर येथील जवळपास सर्वच गावातील सरपंच ,उपसरपंच ,काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपात एंट्री केली आहे.

   भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना भाजपात येण्यासाठी आग्रह नाही मात्र येणाऱ्यांचे स्वागत अशीच भूमिका घेतली आहे. मात्र शहरासह जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना खा. अशोकराव चव्हाण पूर्ण करू शकतात असा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व नांदेडकरांना आहे. यातून कोणत्याही निमंत्रण ,आमंत्रणची प्रतीक्षा न करता नांदेडकरांकडून निर्णयाचे स्वागत तर काँग्रेस कार्यकर्ते भाजपचे कमळ हाती घेत आहेत. शहरातील मगनपुरा भागातील प्रगती महिला मंडळ येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्धापूर येथील भाजपात येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पक्ष प्रवेश सोहळ्याला माजी आमदार अमरनाथ राजूरकर,नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी सभापती शामराव पाटील, व्यंकटराव मामा कल्याणकर, केशवराव इंगोले, भिमराव कल्याणकर, बाबुराव लंगडे आदींची उपस्थिती होती.

    यावेळी अर्धापूर तालुक्यातील गणपतराव शामराव पाटील तिडके,संजय लहानकर ,बालाजी गव्हाणे ,आनंदराव किशनराव कपाटे, वसंतराव चंपतराव कपाटे, शामराव यादोजी टेकाळे, ज्ञानेश्वर बाबुराव राजेगोरे, गजानन कोंडीबा कदम, निळकंठ बाळासाहेब मदने, व्यंकटराव बाबाराव कल्याणकर, सुभाषराव देशमुख, आनंदराव सावते, साहेबराव राठोड, सुभाषराव नामदेवराव कल्याणकर, लालजी गोडाजी कदम, बळवंतराव रंगराव इंगोले, मोतीराम पाटील जगताप, दत्ता पाटील सूर्यवंशी, आनंदराव किशनराव कपाटे, वसंतराव चंपतराव कपाटे, वसंतराव रामराव कल्याणकर, गणेशराव संभाजी बोंठारे, विजय रामराव भुसे, राजाराम नारायणराव पवार, शिवसांब गोविंदराव बारसे, मदन देशमुख, राजेश बारसे, शंकरराव केशवराव टेकाळे, सुनील याम्नाजी अटकोरे, अमोल गणेशराव डोंगरे, शिव लिंग शिवसाम स्वामी, अशोक सावंत, भास्कर वैद्य ,केशवराव इंगोले आदी प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.यासमवेतच अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी विकासाचा मार्ग निवडत भाजपात प्रवेश केला आहे.

टिप्पण्या