आदिवासी समाजाच्या मागे उभे राहावे-सुर्यकांत वाणी

 

नांदेड/प्रतिनिधी-आदिवासी समाजबांधवांच्या मागे सामाजिक संघटनांनी उभे राहावे असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते सूर्यकांत वाणी यांनी केले आहे.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी महादेव कोळी तसेच मनेरवारलू समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला समाजवादी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी ते बोलत होते. आदिवासी महादेव कोळी तसेच मनेरवारलू समन्वय समितीच्यावतीने संपुर्ण महाराष्ट्रात समाजाच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला समाजवादी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती सूर्यकांत वाणी यांनी यावेळी दिली. तसेच कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनीही दोन तास अन्नत्याग आंदोलनात सहभाग नोंदवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.  
टिप्पण्या