मुखेड / प्रतिनिधी
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आठवडाभरात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्यपालांकडे मुखेड येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मुखेड येथील महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, युवक काँग्रेस विधानसभाध्यक्ष संतोष बोंनलेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत
तहसीलदारांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देऊन गोळीबारांच्या घटनांप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. जणू महाराष्ट्राचा बिहार झाले असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या एका आठवड्यात सत्ताधारी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलिस अधिकाऱ्यांच्या दालनात गोळीबार करून सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला जखमी केले असतानाच जळगावत भाजपाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार होतो.तर लगेच दुसऱ्या दिवशी राजधानी मुंबईतील दहिसर येथे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घालून ठार मारले जाते. यावरून गुंडांना पोलीस खात्याचा वचक उरला नाही हे सिद्ध होते. या सर्वांची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री म्हणून मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अथवा राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घेऊन गृहमंत्री बदलावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ.श्रावण रॅपणवाड, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष बोनलेवाड, वंचीत बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष शंकर पाटील श्रीरामे, काँगेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, शिवसेना ( ऊ.बा.ठा. ) शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) शहराध्यक्ष सुनिल मुक्कावार,काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष के.एच.हसनाळकर,मा.नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड,जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर साखरे,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अदनान पाशा,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ईमराण पठाण,शहर सहसचिव सय्यद वाजीद, मोहनराव गवळे,काँगेस शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,अनु- जाती शहराध्यक्ष अमोल पोतलवाड,धर्माजी वाघमारे,योगेश कामघंटे, शिवशांब ईरमुलवाड,शिवाजी कांबळे सह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा