नवी मुंबई (मारुती विश्वासराव) :-
सानपाडा येथे गांव चलो अभियान अंतर्गत नवी मुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संदीप नाईक यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सिताराम मास्तर ऊद्यानमध्ये ज्येष्ठाना क्रिकेटचे चेंडु लागुन अनेक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे मैदानात (नेट ) जाळी बसून दिली जाईल. स़ंघात पंतप्रधान मा,नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठासाठी ज्या नवीन शासकीय योजना आणल्या. त्याबद्दलची संपूर्ण माहिति पत्रक संघात १५ दिवसात उपलब्ध करून देणार आहे. संघाच्या कार्यकारी मंडळाचे कार्य पाहुन विरंगुळा केंद्रास एक लाख रूपये देणगी दिली जाईल. त्यांनी ज्येष्ठाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. सर्व नाईक परिवार सदैव तुमच्या सोबत असेल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले, तर अध्यक्ष मारूती ना. कदम यांनी संघाचे वतीने संदीप नाईक यांचा सत्कार केला. याप्रसंगी मारुती कदम यांनी संघाचे वतीने विविध मागण्या मांडल्या. कार्यक्रमास सानपाडा विभागातील समाज सेवक भाऊ भापकर, आबा जगताप, गणेश कमळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सर्वश्री सुभाष बारवाल, शरद पाटील, डॉक्टर विजया गोसावी, श्रीमती भानुमती शहा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा